आम्ही दंड भरू पण मास्क लावणार नाही अशी नागरिकांची भूमिका! <br />उमरेड (जि. नागपूर) : कोरोनाने नागपूर शहर सोबतच ग्रामीणमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, उमरेड शहर व संबंधित तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नाही. वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टनसिंग व मास्क वापरण्याचे प्रखरतेने वारंवार सूचित केले जात आहे. तरीसुद्धा नागरिक घराबाहेर पडताना बेजबाबदारपणे मास्क न लावताच रस्त्यांवर व बाजारात गर्दी करीत आहेत. म्हणून नगर परिषद, महसूल विभाग व पोलिस विभागाचे सैनिक आता रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करून पाचशे रुपये दंड आकारत आहेत. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.